Woman Doctor Duped of ₹80 Lakh
छत्रपती संभाजीनगर : नवाब वंशज असल्याचा बनाव रचून आणि मोक्याच्या शासकीय जमिनीचे आमिष दाखवून महिला डॉक्टरकडून तब्बल ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये सिराज यारखान हसन यारखान (रा. मिल कॉर्नर), सय्यद तौखीर हैदर एस. के. हुसेन (रा. राघवेंद्रनगर, सिकंदराबाद) आणि सय्यदा तस्लीम फातिमा मीरलायक अली (रा. पुरानी हवेली, चारमिनार, हैदराबाद) यांचा समावेश आहे.
डॉ. रुबिना नसिरुद्दीन सिद्दिकी (रा. रोजेबाग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी नवाब वंशाचा बनाव करून त्यांना मोठ्या जमिनीतील गुंतवणुकीचे आमिष दाखवले. जुलै २०२१ मध्ये आरोपींनी फिर्यादींना गुंतवणुकीसाठी राजी केले आणि ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान ८० लाख रुपये घेतले.
नंतर जमीन ताब्यात देण्याची मागणी केल्यावर फिर्यादींना खोटी इसारपावती देण्यात आली. मात्र, ती जमीन शासकीय असल्याची माहिती मिळताच फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. संशयित आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट जीपीए (जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी) दाखवली होती.
सिराज यारखान आणि हसन यारखान यांना काल पोलिसांनी सायंकाळी ७.३० वाजता अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*