छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कामगिरीत सराईत चैन स्नॅचरला जेरबंद केले आहे. 3 मे 2024 रोजी वैजापुर येथील अल्का बाळासाहेब सोनवणे या महिलेला, त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले होते. या घटनेबाबत वैजापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सतिष वाघ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हा गुन्हा शनिदेवगाव येथील सराईत गुन्हेगार बबलू उर्फ बबन मोहन चव्हाण याने आपल्या साथीदारांसह केला असल्याचे समजले. पोलिसांनी तात्काळ तपास पथकाची नियुक्ती करून शनिदेवगाव येथे शोधमोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान, बबलू चव्हाण हा गोदावरी नदीच्या काठावर लपून बसल्याचे आढळले. त्याने नदीत उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली.

चौकशीत चव्हाणने गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. तसेच, या आरोपीने यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे मंगळसूत्र चोरीचा गुन्हा केल्याची कबुली देखील दिली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरी केलेली आणखी एक मोटारसायकल जप्त केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात एकूण ₹70,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास वैजापुर पोलीस ठाणे करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिष वाघ व त्यांच्या पथकाने पार पाडली.

____________________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,274 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क