मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कन्नड येथे महायुतीच्या उमेदवार संजना जाधव यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. “मी बोगदा व टनेल बांधण्यात एक नंबर आहे,” असे सांगत त्यांनी शहराच्या पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याची व शेतीपूरक उद्योगांना चालना देण्याची ग्वाही दिली. शिंदे म्हणाले, “केंद्रात मोदी आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने विकासाचा वेग दुप्पट होईल.”
शिंदे यांनी विशेष “लाडकी बहीण” योजनेत अर्थसहाय्य वाढवून २१०० रुपये देण्याचे जाहीर केले. एस.टी. महामंडळ तोट्यातून नफ्यात आणल्याचे सांगून त्यांनी महिलांसाठी एस.टी. प्रवासात दिलेल्या सवलतींचे उदाहरण दिले.
महाविकास आघाडीवर टीका करत शिंदे म्हणाले, “हे सरकार घेणाऱ्यांचे नव्हे, देणाऱ्यांचे आहे.” त्यांनी विरोधकांवर जातीय फुटीचा आरोप करत जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले. “मी बाळासाहेबांचा चेला आहे, माझ्या बहिणी व शेतकऱ्यांसाठी हजार वेळा तुरुंगात जाण्यास तयार आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी ग्राम सडक योजनेत रस्ते, १०० खाटांचे हॉस्पिटल, कन्नड तालुक्यातील पर्यटन विकास, फूड प्रोसेसिंग युनिट, तसेच शेतमालासाठी २०% अधिक भाव देण्याची ग्वाही दिली. महायुतीची सत्ता आल्यास या सर्व प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*