छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातील विकासासाठी नागरिकांनी महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांना समर्थन दिले. सोमवारी वार्ड क्रमांक 47, राजाबाजार येथे महायुतीच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत अतुल सावे यांचे स्वागत केले आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी पाठिंबा दर्शवला.
यावेळी अतुल सावे यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व विकासाचे वचन दिले. “प्रत्येक भागाचा समतोल विकास करणे माझे ध्येय आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्य, रस्ते व पायाभूत सुविधा यासाठी महायुती कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अनिल मकरिये, लक्ष्मीकांत पिंपळे, रामचंद्र जाधव, शैलेश पाटणी, जगदीश सिद्ध, नागेश भालेराव, अरविंद कामटीकर, राजेश गदिया यांसह अनेक महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*