औरंगाबाद मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ काढलेल्या पदयात्रेत बोलताना ऋषिकेश जैस्वाल व विश्वनाथ राजपूत यांनी महायुती सरकारचे कार्य अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, महायुती सरकारने सर्व स्तरावरील नागरिकांच्या विकासासाठी उपाययोजना केल्या असून, युवकांच्या समस्याही सोडविल्या आहेत. आगामी काळातही रोजगार आणि विकास यासंदर्भातील उपाययोजना महायुती सरकारकडून केल्या जातील.
ऋषिकेश जैस्वाल आणि विश्वनाथ राजपूत यांनी मतदारांना आवाहन केले की, उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी जैस्वाल यांचे औक्षण करून, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत केले. या प्रसंगी नागरिकांनी जैस्वाल यांना मतदानाचा विश्वास दिला.
पदयात्रेत राजू अहिरे, के. एम. पाटील, रमेश सूर्यवंशी, सागर पाले, मुकेश जैन, ह.भ.प. शिरसाट आणि अन्य महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*