औरंगाबाद-मध्य विधानसभा मतदारसंघात हिंदू मतांची विभागणी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी परत करणारे किशनचंद तनवाणी यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तनवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळीच ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, जी आज खोटी ठरली नाही.

शहरातील औरंगाबाद-मध्य मतदारसंघात शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, उद्धवसेनेकडून जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी मिळाली होती. तनवाणी यांनी हिंदू मतांची विभागणी टाळण्यासाठी ही उमेदवारी परत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या एक दिवस आधी ही घोषणा केली होती. तनवाणी यांनी सांगितले की, जैस्वाल हे माघार घेत नसल्याने एमआयएमला फायदा होऊ नये म्हणून त्यांनी उमेदवारी न लढविण्याचा निर्णय घेतला.

 

या निर्णयामुळे उद्धवसेनेला नव्या उमेदवाराची निवड करावी लागली. तनवाणी यांनी आठ दिवसांपूर्वी उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि शिंदे गटात प्रवेशाची चर्चा सुरु होती. अखेर आज गुरुवारी तनवाणी यांनी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत सचीन झव्हेरी, सोमनाथ बोंबले, सुधीर नाईक, आदित्य दहिवाल यांच्यासह इतर पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी झाले.

 

तनवाणी हे प्रामाणिक मित्र – प्रदीप जैस्वाल

आमदार प्रदीप जैस्वाल यांनी तनवाणी यांना प्रामाणिक मित्र संबोधले असून, तनवाणी हे प्रामाणिकपणे काम करणारे आहेत, असे त्यांनी सांगितले. हिंदू मतांची विभागणी टाळण्यासाठी तनवाणी यांनी ‘मध्य’ची उमेदवारी परत केली असून, त्यांच्यामुळे आपली विजयाची लीड वाढणार असल्याचा आत्मविश्वास जैस्वाल यांनी व्यक्त केला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,246 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क