छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचारासाठी बुधवारी ठाकरे नगर, वार्ड क्रमांक 81 येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत सावे यांनी मतदारांशी थेट संवाद साधला, त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या व मतदारसंघाच्या विकासासाठी महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
सावे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मागील अडीच वर्षांत मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचे विकासकाम पूर्ण करण्यात आले असून त्यामुळे मतदारसंघात लक्षणीय बदल घडून आले आहेत. परंतु, हा विकास अजूनही अपूर्ण असल्याचे सांगत, मतदारसंघाचे संपूर्ण रूपांतर करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण कामे बाकी आहेत, असे ते म्हणाले.
रस्त्यांचे सुधारकाम, पाण्याची सोय, आणि स्वच्छता या मूलभूत सुविधा सुदृढ करण्यात त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. मतदारांनी महायुतीला पाठिंबा देऊन या विकासप्रवासा मध्ये सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महायुतीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*