गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या वधू-वरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदाच्या वर्षात, पंचांगकर्त्यांनी तब्बल ११ महिन्यांत ८० शुभ लग्नतिथी जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विवाहाची प्रतीक्षा करणाऱ्यांना आता धूमधडाक्यात लग्न करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
१४ एप्रिलपासून सुरू होणार लग्नसराई
गुढीपाडव्यापासून लग्नतिथींचा मुहूर्त नसल्याने अनेक कुटुंबांनी विवाहसोहळे पुढे ढकलले होते. मात्र, आता १४ एप्रिलपासून विवाह मुहूर्तांना सुरुवात होत आहे. एप्रिल महिन्यात एकूण ८ लग्नतिथी असून, ‘मे’ महिन्यात सर्वाधिक १४ लग्नतिथी आहेत. परिणामी, या दोन महिन्यांत विवाहांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा आहे.
बाजारात लगबग, लग्नसराईसाठी सज्जता
लग्नसराईची चाहूल लागताच कापड बाजारात चांगलीच धूम सुरू झाली आहे. वेडिंग ड्रेस, साड्या, शेरवानी, सजावट व बस्त्यांची खरेदी जोरात चालू आहे. सराफा बाजारात मात्र सोन्याच्या दरवाढीमुळे थोडीशी शंका दिसून येत आहे. तरीसुद्धा, विवाहासाठी गरजेच्या वस्तूंची मागणी वाढली आहे.
गौण आणि आपत्काळातील तिथींना पसंती
प्रमुख मुहूर्तासोबतच, पंचांगकर्त्यांनी अडचणीच्या प्रसंगांसाठी काही गौण व आपत्काळातील तिथीही दिल्या आहेत. ज्यांच्या घरी ज्येष्ठ व्यक्ती आजारी आहेत किंवा वधू-वर परदेशात आहेत अशांसाठी या तिथी महत्त्वाच्या ठरतात.
अडचणीच्या काळातील महत्त्वाच्या तिथी:
जून – १०, १२, १६, १९, २०, २१
जुलै – २, ३, ४, ५, ७, ९, १२
ऑक्टोबर – २६, ३०, ३१
नोव्हेंबर – ३, ४, ७, १३, १५, १६
डिसेंबर – १२, १३, १५
जानेवारी (२०२६) – २०, २३, २४, २५, २६
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*