आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षप्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी आज एका पत्रकार परिषदेत राज्यातील पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह विद्यमान दोन आमदारांचाही समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली होती. मात्र, ८ सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जलील यांनी मागील आठवड्यात केली होती. सोमवारी पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत हज हाऊस येथे वक्फ बिलाच्या विरोधात एक परिषद घेण्यात आली.
या परिषदेनंतर ओवेसी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “आघाडीने चर्चेनंतर निर्णयाची माहिती दिली नाही, त्यामुळे आम्ही आज पाच उमेदवारांची घोषणा करीत आहोत.” या यादीत छत्रपती संभाजीनगर येथून प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, मालेगाव येथून विद्यमान आ. मुफ्ती मोहम्मद इस्माईल, धुळे येथील आ. फारूक शहा, सोलापूर येथून फारूक शाब्दी, आणि मुंबई येथून रईस लष्करीया यांचा समावेश आहे.
एमआयएमने आघाडीला ठणकावून स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार दाखवला आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा निर्णय कोणता प्रभाव पाडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*