राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे राज्यपालपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात येत आहेत, आणि त्यांच्या या दौऱ्याच्या तयारीसाठी प्रशासनाकडून संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. रविवारी रात्री उशिरा प्रशासनाला त्यांच्या दौऱ्याची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर, प्रशासनाच्या कार्यक्षमतेची कसोटी लागली. अवघ्या एका दिवसात संपूर्ण दौऱ्याची तयारी करण्यासाठी प्रशासनाला मोठा ताण सहन करावा लागला.
राज्यपालांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेण्याचे नियोजन करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दिवसभर बैठका सुरू होत्या. दौऱ्यात राज्यपाल आजी व माजी मंत्री, आमदार, खासदार, तसेच प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक, साहित्यिक, उद्योजक, आणि विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या भेटी घेणार आहेत.
राज्यपालांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अनेक संघटना व नागरिक त्यांच्याकडे तक्रारींना घेऊन येतील अशी शक्यता आहे. संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. सुभेदारी विश्रामगृहाबाहेर तहसीलदारांचा एक कक्ष ठेवण्यात येणार असून, सर्व निवेदन तिथे स्वीकारून राजभवनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी दिली.
राज्यपालांच्या या दौऱ्यामुळे शहरात चैतन्याचे वातावरण आहे, आणि प्रशासन या दौऱ्याला यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*