राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे हे येत्या 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली.
याआधी जरांगे यांनी 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता, परंतु आता त्यांनी 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने चिघळण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे यांनी याआधी राज्यभरात 288 उमेदवार उभा करण्याची घोषणा करून राजकीय वातावरणात खळबळ माजवली होती. त्यानंतर त्यांच्या घोंगडी सभांच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील वातावरण तापवले आहे. आता 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसण्याच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने चर्चेत येणार असून, राज्य सरकार आणि महायुती यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*