सिल्लोड तालुका म्हणजे पाकिस्तान झाला आहे, असा आरोप करत पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करणाऱ्या रावसाहेब दानवे यांना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “इतके वर्ष पाकिस्तान चालत होता, तेव्हा त्याला मोठं करणारे रावसाहेब दानवेच होते. आता त्यांचा पराभव झाला म्हणून त्यांना पाकिस्तान दिसत आहे. जिंकले असते तर वेगळं काही बोलले असते,” अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीकास्त्र डागले.

सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. “या सरकारने कोणताही रंगाचा पेहराव घातला, हिरवा, निळा, लाल किंवा गुलाबी असो, तरी आतून हे सरकार काळंच आहे. त्यांचा मूळ रंग काळाच आहे,” असे टीकास्त्र त्यांनी यावेळी सोडले.

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठवाड्याला सुजलाम-सुफलाम करण्याच्या घोषणांना एक वर्ष उलटूनही कोणतेही परिणाम दिसत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. “ही निव्वळ घोषणाच राहिली आहे,” असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

877 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क