मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यान येथे ध्वजारोहण केले. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य सरकार मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी खंबीरपणे उभे आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मागील वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक आयोजित करून ५९ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्या अंतर्गत अनेक प्रकल्प सुरू झाले असून, काही निर्णयांवर कामही सुरू आहे. त्याचबरोबर, अथर व टोयोटा या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी छत्रपती संभाजीनगरात गुंतवणूक करण्याचे करार पूर्ण केले आहेत, ज्यामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.
सरकारची मराठवाड्यातील युवकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी देण्याची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेतली आणि त्यांचे प्रश्न ऐकून घेतले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. याच वेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध १६ प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण देखील पार पडले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*