गणपती बाप्पाच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी म्हणजे आज घरोघरी महालक्ष्मीचे बाळांसह आगमन होणार आहे. या उत्सवानिमित्त सोमवारी जुन्या शहरातील बाजारपेठांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. लक्ष्मीचे मुखवटे, मखर, साड्या, पूजेचे साहित्य, हार, सजावटीचे सामान अशा वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली.
कोकणात गौरी-गणपतीचा सण म्हणून ओळखला जाणारा हा उत्सव मराठवाडा आणि विदर्भात महालक्ष्मीचा सण म्हणून साजरा केला जातो. महालक्ष्मी आपल्या माहेरी येते, यामुळे तिचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. या सणाचे मंगळवारी आगमन, बुधवारी पूजन आणि गुरुवारी विसर्जन असे तीन दिवसांचे स्वरूप आहे.
महालक्ष्मीच्या आवाहनाचा मुहूर्त:
– महालक्ष्मी आवाहन मंगळवारी सप्तमी तिथी रात्री ११:१३ वाजेपर्यंत आहे. मात्र, अनुराधा नक्षत्र रात्री ८:०४ वाजेपर्यंत असल्यामुळे, या वेळेत महालक्ष्मीचे आवाहन करता येईल.
– महालक्ष्मीच्या मुखवट्यांना घराबाहेरून वाजतगाजत घरात आणून स्थापित करावे. दिवसभरात कधीही महालक्ष्मींना घरी आणू शकता.
– बुधवारी (दि.११) अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मी पूजन रात्री ११:४७ वाजेपर्यंत करता येईल. यामुळे महानैवेद्य आणि पूजन रात्री ९:२२ वाजेपर्यंत पूर्ण करावे.
– गुरुवारी (दि.१२) महालक्ष्मीचे विसर्जन नेहमी मूळ नक्षत्रावर असते. सकाळपासून ते रात्री ९:५३ वाजेपर्यंत विसर्जन केले जाऊ शकते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*