लिंगमपल्ली ते मुंबई जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या शौचालयात एका नवजात मुलीला टाकून तिचे आई-वडील फरार झाल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार मध्यरात्री घडला असून, शौचालयातून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने प्रवाशांना याची जाणीव झाली.

घटनेत आढळून आलेली मुलगी साधारणत: एक ते दीड महिन्यांची आहे. कुटुंबाने रेल्वे प्रवासादरम्यान रात्रीच्या वेळी मुलीला शौचालयात बेवारस अवस्थेत सोडून दिले आणि तेथून पळ काढला. हा प्रकार छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ मनमाड रेल्वे स्थानकावर गाडी पोहोचताच पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी गाडीत शोध घेतला, परंतु कोणीही मुलीची जबाबदारी स्वीकारली नाही. त्यामुळे रेल्वे पोलीस ठाणे मनमाड येथे या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी माहिती पत्रक काढून बाळाच्या कुटुंबियांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. सुदैवाने, मुलगी सुखरूप असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,192 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क