{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

विधानसभा निवडणूक २०२४ साठी मतदान प्रक्रियेनंतर आता मतमोजणीसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून, प्रशासनाने मतमोजणी केंद्रांची यादी जाहीर केली आहे. विधानसभा मतदारसंघानुसार मतमोजणीची ठिकाणे खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहेत:

  • सिल्लोड (१०४): शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर-जळगाव हायवे, सिल्लोड.
  • कन्नड (१०५): इनडोअर हॉल, शिवाजी महाविद्यालय, कन्नड.
  • फुलंब्री (१०६): गरवारे हायटेक फिल्म्स लि., चिकलठाणा एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर.
  • औरंगाबाद (मध्य) (१०७): शासकीय तंत्रनिकेतन, रेल्वेस्टेशन रोड, उस्मानपुरा.
  • औरंगाबाद (पश्चिम) (१०८): शासकीय अभियांत्रिकी विद्यालय, रेल्वेस्टेशन रोड.
  • औरंगाबाद (पूर्व) (१०९): सेंट फ्रान्सिस डी सेल्स हायस्कूल, जालना रोड.
  • पैठण (११०): प्रशासकीय इमारत, संतपीठ, जायकवाडी धरणाजवळ, पैठण.
  • गंगापूर (१११): इनडोअर स्टेडियम हॉल, श्री मुक्तानंद महाविद्यालय, गंगापूर.
  • वैजापूर (११२): टेनिस कोर्ट हॉल, विनायक पाटील महाविद्यालय, येवला रोड, वैजापूर.

प्रशासन सज्ज:

मतमोजणी प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था असून, शांतता आणि पारदर्शकता राखण्यासाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

नागरिकांसाठी सूचना:

मतमोजणीदरम्यान केंद्रांच्या आसपास वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,814 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क