जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढत चालला असून, रविवारी सायंकाळी ६ वाजता धरणातील जलसाठा ९६.३७ टक्के नोंदवला गेला. सोमवारी सकाळी ६ वाजता हा साठा ९७.३७ टक्क्यांवर पोहोचला. पाण्याची आवक कमी असली तरी, धरणातील पाणी साठा ९८ टक्क्यांच्या जवळ पोहोचल्यामुळे आज दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान धरणाचे ६ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले असून, गोदावरी नदीत ३१४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि नाशिक परिसरातून पाण्याची आवक कमी झाल्याने रविवारी संध्याकाळी धरणाची पातळी १५२१.३९ फूट (९६.३७ टक्के) झाली होती. धरणाची एकूण क्षमता १५२२ फूट असून, सध्या धरणात २०९२.१२४ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. याशिवाय, उजव्या कालव्याद्वारे माजलगाव धरणासाठी ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
आज सकाळी जलसाठा ९७.३७ टक्क्यांवर पोहोचल्याने दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान नाथसागर धरणाचे गेट क्र. १०, २७, १८, १९, १६ आणि २१ हे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीत ३१४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. याआधी २०२२ मध्ये देखील धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BJSJXD6pg1BLvrKC4OK11S
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*