स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि भाडेतत्त्वावर एकत्र राहणाऱ्या तरुणांच्या घरात शिरून मोबाइल चोरी करणारा कुख्यात गुन्हेगार शेख माजिद शेख गफ्फर (३६) याला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेले ११ मोबाइल आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
सिडको, उस्मानपुरा, क्रांतीचौक, समर्थनगर या भागांत सतत मोबाइल चोरीच्या घटना घडत होत्या. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे आणि पोलिस भरतीसाठी तयारी करणारे तरुण भाडेतत्त्वावर खोली करून राहायचे. याच गोष्टीचा फायदा घेत माजिद सकाळच्या वेळेत घराचे दरवाजे उघडे असल्याचे पाहून घरात शिरत आणि मोबाइल चोरत असे.
शनिवारी पिसादेवी रोडवर दोन मोबाइल चोरल्यानंतर माजिदला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. उपनिरीक्षक प्रमोद देवकाते यांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने बीडला विकलेले ११ मोबाइल आणि एक चोरीची दुचाकी जप्त केली.
दिवसा टॅक्सीचालक, सकाळी चोर
माजिदचा गुन्हेगारीचा इतिहास पाहता, त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यानंतर माजिदने टॅक्सी चालवून कमाई करण्याचे आश्वासन दिल्याने पत्नी पुन्हा त्याच्यासोबत राहायला आली. मात्र, सकाळी ६ ते ८ या वेळेत मोबाइल चोरी करून तो पुन्हा टॅक्सी चालवण्यासाठी निघायचा. शनिवारी मात्र पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.
या कारवाईत अंमलदार सुभाष शेवाळे, मंगेश पवार, प्रदीप दंडवते, सहदेव साबळे आणि विशाल सोनवणे यांनी सहभाग घेतला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*