शहरातील जळगाव रोडवर शुक्रवारी रात्री एका भरधाव बसने दुचाकीस्वार तरुणाला धडक देत तब्बल १०० फूट फरफटत नेले. या भीषण अपघातात दुचाकीस्वार देवीदास अंबादास कापसे (३५), हे जागीच मृत्युमुखी पडले. देवीदास हे मूळ गंगापूर तालुक्यातील पोटूळ येथील रहिवासी होते आणि सध्या टीव्ही सेंटर, हडको येथे राहत होते.
शुक्रवारी रात्री ८:३० वाजता एसबीओए शाळेसमोर हा भीषण अपघात घडला. देवीदास हे वायरमन म्हणून काम करत होते, आणि काम आटोपून हसूल टी पॉइंटकडून आपल्या घरी टीव्ही सेंटरकडे जात असताना खासगी कंपनीची एक बस (एमएच २० डीडी ०६७७) सौभाग्य चौकातून सुसाट वेगाने येऊन त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की देवीदास यांना १०० फूट फरफटत नेले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर देवीदास यांच्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला होता. हा अपघात पाहून घटनास्थळी मोठी गर्दी जमली. या घटनेची सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*