जवाहरनगर आणि उस्मानपुऱ्यात अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडल्या आहेत. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:३० ते ८ या वेळेत या घटना घडल्या असून, चोरांनी दीड तासात दोन महिलांना लक्ष्य केले.

शहरात सोनसाखळी चोरांनी पुन्हा एकदा सक्रिय होऊन महिलांना घाबरवण्यास सुरुवात केली आहे. नवरात्रीमुळे पहाटेच्या वेळी मंदिरात जाणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याने चोरट्यांचा धोकादायक वावर वाढला आहे. प्रिया धाडीवाल (६३, सहयोगनगर) या ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ६:३० वाजता मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शनानंतर त्या रिद्धीसिद्धी हॉलसमोरून पायी घरी परतत असताना, मागून आलेल्या दुचाकीस्वार चोरांनी त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावले.

त्याच दिवशी, विद्या डंक (६९, न्यू एसबीएच कॉलनी) या ज्योतीनगर परिसरात देवीच्या पूजेसाठी फुले गोळा करून घरी जात होत्या. या वेळी दुचाकीवर आलेल्या चोरांनी त्यांच्याही गळ्यातील १.५ तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पसार झाले.

या दोन्ही घटनांची नोंद जवाहरनगर आणि उस्मानपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

535 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क