मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील आज विधानसभेच्या निवडणुकीतील आपले उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहेत. पाटील यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषदेत ते या निर्णयाची घोषणा करणार आहेत. या निर्णयापूर्वी सकाळी सात वाजल्यापासून अंतरवाली सराटी येथे इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहेत. इच्छुक उमेदवारांमध्ये एकमत नसल्याने या संवादातून त्यांच्या नाराजीचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा, मुस्लिम, आणि दलित या जातींना एकत्र आणण्याचा “एमएमडी फॅक्टर” तयार केला आहे, ज्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील आनंदराज आंबेडकर, राजरत्न आंबेडकर आणि मुस्लिम धर्मगुरू सय्याद नोमानी यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या नव्या समीकरणाच्या यशस्वितेकडेही लक्ष लागले आहे.
जरांगे पाटील यांचे आजचे निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला नवीन दिशा देऊ शकतात.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Ft8fsQP39yQGkQlB6iF90j
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*