क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने हजारो लोकांना फसवण्याच्या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या नरेंद्र पवार याने संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल २० जणांना १ कोटी २८ लाख ७२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीमुळे त्याला अटक करण्यात आली असून, पोलिसांचा संशय आहे की हा घोटाळा १५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.
2022 ते 2023 या कालावधीत पवारने छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा येथे ट्रेडिंग कंपनीचे कार्यालय उघडून, २० महिन्यांत दाम दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून, १ हजारहून अधिक लोकांना गंडा घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे, आणि फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या महाघोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, पवारच्या अटकेनंतर आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*