कार विक्रीचे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिक विजय गणराज यांची तिघांनी २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी साबेर नाजेरुद्दीन सिद्दीकी (६२, रा. भडकलगेट), प्रितेश बाफना (३६) आणि प्रकाश फुलचंद बाफना (६२) यांच्यावर बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये आरोपी साबेरने गणराज यांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत शोरूमच्या डेमो कार विक्रीसाठी असल्याचे सांगितले. गणराज यांना प्रितेश आणि प्रकाश यांची ओळख करून देण्यात आली. अदालत रोडवरील एका कार शोरूममध्ये त्यांची भेट झाली, जिथे गणराज यांना कार दाखवण्यात आली. पैसे मिळाल्यानंतर कार त्यांच्या नावावर करून देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले.
५ लाख रुपयांमध्ये व्यवहार ठरला असता, गणराज यांनी २ लाख ६० हजार रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिली. मात्र, ठरलेल्या १५ जानेवारी, २०२४ या तारखेनंतरही कार मिळाली नाही. नऊ महिने उलटूनही कार मिळाली नसल्याने, आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर गणराज यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*