Oplus_131072

बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या आणि आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षेची तयारी करणाऱ्या साहिल शीलवंत नांदेडकर (वय १७, रा. स्नेहनगर) या तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. साहिल हा छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस दलातील पोलिस उपायुक्त (प्रशासन) शीलवंत नांदेडकर यांचा मुलगा होता. या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून साहिलच्या कुटुंबासह पोलिस प्रशासनालाही मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साहिल आई-वडिलांसोबत घरी होता. रविवारी सकाळी वडील मार्निंग वॉकसाठी बाहेर जाणार होते, त्याचवेळी त्यांना बेडरूममध्ये साहिलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

साहिलच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबीयांसह मित्र-परिवार आणि पोलिस दलाला मोठा धक्का बसला आहे. प्रतापनगर स्मशानभूमीत दुपारी ४ वाजता साहिलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी, विविध क्षेत्रातील नागरिक आणि त्याच्या नातेवाईकांची मोठी उपस्थिती होती.

साहिल हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता आणि जेईई अॅडव्हान्स परीक्षेत यश मिळवण्यासाठी कष्ट घेत होता. मात्र, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी घरातील आरशावर नवीन जीवनाला सुरुवात करीत असल्याचे लिहीत आई-वडिलांविषयी प्रेम व्यक्त केले होते.

या दुर्दैवी घटनेमुळे शहरात शोककळा पसरली असून साहिलच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,882 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क