आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी सरकारने मंत्रिमंडळ बैठकींना गती दिली आहे. बैठकीत तब्बल १९ निर्णय घेण्यात आले असून, यातील सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय म्हणजे मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. ही माफी आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
धारावी पुनर्विकास योजनेतही मोठी भर पडली असून, मुंबईतील १२५ एकर जागा या योजनेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन करणे, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना मंजुरी, दमणगंगा-गोदावरी नदी जोड योजना यांना मान्यता यासारखे विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
महत्त्वाचे निर्णय:
- मुंबईतील पाच प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ.
- धारावी पुनर्विकासासाठी १२५ एकर जागेचा निर्णय.
- आगरी समाजासाठी महामंडळ स्थापन.
- पुणे मेट्रो रेल्वे टप्पा २ कामांना मान्यता.
- दमणगंगा-गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता.
- राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चा प्रारंभ.
या निर्णयांमुळे राज्यातील विविध प्रकल्पांना गती मिळणार असून, जनतेच्या दैनंदिन जीवनातही बदल होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CO4fHlr5ZNK2r7chONnpJe
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*