छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक पवित्रा घेत औरंगजेबविरोधात जोरदार पोस्टरबाजी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबावर भाष्य करत, “आम्हाला संपवायला आलेला औरंगजेब इथेच गाडला गेला,” असे विधान केले होते. याच विधानाला केंद्रस्थानी ठेवत मनसेने शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोस्टर्स लावली आहेत.
या पोस्टर्सवर औरंगजेबविरोधातील मजकूर असून, छत्रपती संभाजीनगरपासून औरंगजेबाच्या कबरीचे अंतरही त्यावर नमूद करण्यात आले आहे. मनसेच्या जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांचे नाव या पोस्टर्सवर असून, त्यामुळे या आंदोलनाला अधिकृत स्वरूप आले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मागील दोन दिवसांत तब्बल ७ हजार पर्यटकांनी खुलताबाद येथे जाऊन औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. मनसेच्या या पोस्टरबाजीमुळे शहरात राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात यावर विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
मनसेच्या भूमिकेमुळे औरंगजेबाच्या इतिहासावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. यापूर्वीही मनसेने विविध विषयांवर आक्रमक आंदोलन केले असून, यावेळी औरंगजेबाच्या मुद्द्यावर पक्षाने आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणावर अधिक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*