शिर्डी येथे साई दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. श्री साईबाबा संस्थानने भाविकांसाठी पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी ही घोषणा केली.
कशी मिळेल विमा संरक्षणाची सुविधा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी भाविकांना साई संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर (sai.org.in) दर्शनापूर्वी नोंदणी करावी लागेल. भाविक घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन घेईपर्यंत, काही अप्रिय घटना घडल्यास या योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.
फक्त या भाविकांनाच मिळेल लाभ
साई संस्थानच्या संकेतस्थळावरून खालील सेवांसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांनाच या योजनेचा लाभ मिळेल:
- ऑनलाइन दर्शन पास बुकिंग
- ऑनलाइन भक्त निवास बुकिंग
- व्हीआयपी दर्शन पास
- सत्यनारायण पूजा पास
- अभिषेक पूजा आगाऊ बुकिंग
भाविकांसाठी मोठा दिलासा
साई संस्थानच्या या निर्णयामुळे शिर्डीला येणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासादरम्यान किंवा दर्शनाच्या वेळी काही अनुचित घटना घडल्यास, या विमा योजनेमुळे भाविक किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळणार आहे.
भाविकांनी ही सुविधा मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन साई संस्थानने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*