Oplus_131072

छत्रपती संभाजीनगर : शहरातील बीड बायपासवरील संग्राम नगर उड्डाण पुलाशेजारी सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या बांधकाम साईटवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात घडला. काम सुरू असताना बेसमेंटमध्ये मुरूम कोसळून दोन मजूर जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

संग्राम नगरजवळील ‘कॅपिटल ट्रेड सेंटर (CTC)’ या व्यापारी संकुलाचे काम सुरू असून, त्यासाठी सुमारे 60 ते 70 फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात पायाभरणी व बेसमेंटचे काम सुरू असताना, अचानक आमदार रोडच्या बाजूचा मुरूम ढासळून तो थेट काम करणाऱ्या मजुरांवर कोसळला. यावेळी साईटवर 5 हून अधिक मजूर उपस्थित होते.

ढासळलेल्या मुरुमामुळे दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुरूम थेट लोखंडी गजांवर कोसळल्याने त्याचे तुकडे व दगड मजुरांच्या अंगावर पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महापालिकेला बांधकाम साईटवरील सुरक्षा उपायांची चौकशी करण्याचे निर्देश दिले. संबंधित ठेकेदार आणि प्रकल्प अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ही दुर्घटना कामगार सुरक्षेच्या अनास्थेचे द्योतक असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,188 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क