छत्रपती संभाजीनगर : शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सूर्य कोपलेला असून उष्णतेने नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारी शहराचे कमाल तापमान ४०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सोमवारी त्यात वाढ होऊन तापमान ४१ अंशांवर पोहोचले आणि आज मंगळवारी तर ४१.६ अंश सेल्सिअसवर पोहचत यंदाच्या उन्हाळ्यातील नवा विक्रम नोंदवला गेला.

आज मंगळवारी किमान तापमानही २६.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले असून, दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होताना दिसते आहे. सलग दुसऱ्या दिवशी ४१ अंश तापमान नोंदवल्याने शहरातील रस्ते सुनसान झाले, तर नागरिक उष्णतेच्या झळांनी हैराण झाले आहेत.

हवामान खात्याने पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत आहे. सोमवारी चिकलठाणा वेधशाळेने ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद घेतली, जे सरासरीपेक्षा तब्बल ५ अंशांनी जास्त आहे.

मागील चार वर्षांतील एप्रिलमधील सरासरी कमाल तापमान:

  • २०२१ – ३८ अंश
  • २०२२ – ४१ अंश
  • २०२३ – ३७ अंश
  • २०२४ – ३८ अंश

यंदा एप्रिलमध्ये वाढलेले तापमान:

  • ५ एप्रिल – ३९.४ / २२.६
  • ६ एप्रिल – ४०.२ / २३.३
  • ७ एप्रिल – ४१.० / २४.१
  • ८ एप्रिल – ४१.६ / २६.२

हवामान खात्याने एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

528 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क