नवी दिल्ली – पहलगाम येथे अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याच्या अवघ्या १५ दिवसांनंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बुधवारी मध्यरात्री १.३० वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कर व हवाई दलाच्या संयुक्त कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) ९ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले.

या कारवाईत बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद येथील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, बहावलपूरमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात सुमारे ३० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे.

भारत सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांत फक्त दहशतवादी अड्डे लक्ष्य करण्यात आले असून पाक लष्कराच्या कोणत्याही अधिकृत प्रतिष्ठानावर हल्ला करण्यात आलेला नाही. ‘ही कारवाई आमच्या शहिद लेकींच्या कुंकवाचा बदला आहे,’ असं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्यांचा निषेध करत म्हटलं की, “धूर्त शत्रूने पाकिस्तानमध्ये पाच ठिकाणी भ्याड हल्ले केले आहेत. याला पाकिस्तान कडक प्रत्युत्तर देईल. संपूर्ण देश पाकिस्तानी लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादी गटांचे मनोबल हादरले असून, भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, देशाच्या सुरक्षेशी कोणीही खेळू शकत नाही.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,243 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क