महागाईच्या झळा सर्व क्षेत्रांना जाणवत असताना आता सलून आणि ब्युटी पार्लर सेवा देखील महागणार आहेत. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने महागाईमुळे सेवा दरात 20 ते 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, ही दरवाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
महागाईच्या वाढत्या फटक्यामुळे सलून व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्य, वीज, भाडे, कामगारांचे वेतन आणि विविध करांमध्ये मोठी वाढ झाल्याने व्यवसायिकांना कमी दरात सेवा देणे परवडत नव्हते. त्यामुळे ग्राहकांना नव्या दरांचे पालन करण्याचे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केले आहे.
दरवाढीचा तपशील
- हेअर कट: ग्रामीण भागात 15-20%, शहरी भागात 20-30%
- दाढी: ग्रामीण भागात 15-20%, शहरी भागात 20-30%
- क्लिन अप, फेशियल, मसाज: ग्रामीण भागात 20%, शहरी भागात 30%
- हेअर ट्रिटमेंट, हेअर कलर: ग्रामीण भागात 20%, शहरी भागात 30%
- हेड मसाज, मेनिक्यूअर, पेडिक्यूअर: ग्रामीण भागात 20%, शहरी भागात 30%
- मेकअप प्रकार: ग्रामीण भागात 20%, शहरी भागात 30%
महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय अनारसे यांनी सांगितले की, नव्या दरांची अंमलबजावणी राज्यभर होणार असून, ग्राहकांनी या दरवाढीसाठी सहकार्य करावे. आर्थिक विवंचनेतून व्यवसाय सावरण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
या दरवाढीमुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असला तरीही व्यवसायिकांनी आर्थिक स्थिरतेसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. आता पाहावे लागेल की, नागरिक या दरवाढीला कसा प्रतिसाद देतात.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*