छत्रपती संभाजीनगर : वायफाय, आरामदायक आसनव्यवस्था, प्रत्येक आसनाजवळ मोबाइल चार्जिंग सुविधा आणि वातानुकूलित यंत्रणा असलेल्या ‘शिवाई’ ई-बसने प्रवाशांच्या पसंतीस उतरण्यास सुरुवात केली आहे. पुण्याला जाणाऱ्या १० बससह, विविध मार्गांवर ई-बससेवा उत्तम प्रतिसाद मिळवत आहे.

पुणे मार्गावर १० ई-बसेस धावत

छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागातून प्रत्येकी ५ अशा १० बसेस सध्या पुणे मार्गावर सुरू आहेत. जिल्ह्यात मे २०२३ मध्ये ५ शिवाई बसेस दाखल झाल्यानंतर सप्टेंबरपासून इतर ई-बसेसची भर पडली. छत्रपती संभाजीनगर विभागात सध्या ३८ ई-बसेस धावत आहेत. या बसेस ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये प्रवाशांना आरामदायक प्रवास देत आहेत.

 

ई-बस मार्गांची माहिती

  • जालना मार्ग : ८ ई-बस
  • कन्नड मार्ग : ४ ई-बस
  • सिल्लोड मार्ग : ४ ई-बस
  • पैठण मार्ग : ६ ई-बस
  • राजूर मार्ग : ४ ई-बस
  • मेहकर मार्ग : ५ ई-बस
  • चिखली मार्ग : ५ ई-बस

उत्पन्नात भरघोस वाढ

गेल्या दोन महिन्यांत एसटी महामंडळाने ई-बससेवेमुळे १ कोटी ५८ लाख ८५ हजार ८३७ रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. येत्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

शिवाई ई-बससेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

“प्रवाशांकडून ई-बससेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून, ही सेवा भविष्यात आणखी लोकप्रिय होईल,” असे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी सांगितले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

270 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क