नवी दिल्ली: “सगळी सोंगं आणता येतात, मात्र पैशाचं सोंग आणता येत नाही,” या उक्तीला सार्थ ठरवत देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे.
डॉ. सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी (आज) दिल्लीतील निगमबोध घाट येथे सकाळी ११:४५ वाजता संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सकाळी ८:३० ते ९:३० या वेळेत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात येईल. याठिकाणी सामान्य नागरिक आणि मान्यवर नेते त्यांना श्रद्धांजली वाहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आणि अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांना विनंती केली आहे की डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीसाठी एक स्मारक उभारले जावे.
डॉ. सिंग यांच्या निधनानंतर देशभर सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, तसेच शासकीय पातळीवर कोणतेही मनोरंजन कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, आणि इतर अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने देश एका दूरदृष्टी असलेल्या अर्थतज्ज्ञ आणि विनम्र नेत्याला मुकला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*