छत्रपती संभाजीनगर : नागरिकांना दिलासा देणारी आणि प्रॉपर्टी टॅक्स वेळेत भरण्यास प्रोत्साहन देणारी योजना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, चालू वर्षाचा मालमत्ता कर किंवा मागील वर्षांची थकबाकी असलेला कर येत्या 31 मे 2025 पूर्वी भरल्यास, नागरिकांना 10% सूट मिळणार आहे.

यासोबतच, ज्यांना महापालिकेने ‘सेव्हन स्टार स्मार्ट सिटीझन’ म्हणून दर्जा दिला आहे, अशा नागरिकांना अतिरिक्त 10% सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण मिळणारी सूट 20% पर्यंत पोहोचू शकते.

ही सवलत मिळवण्यासाठी नागरिकांनी वेळ न दवडता लवकरात लवकर आपला कर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमातून मिळणाऱ्या निधीचा उपयोग शहराच्या विकासासाठी केला जाणार आहे.

कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.chhsambhajinagarmc.org वर ऑनलाइन भरणा करता येऊ शकतो.

शहराचा विकास आणि स्वच्छ प्रतिमा टिकवण्यासाठी नागरिकांनी प्रामाणिकपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

981 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क