छत्रपती संभाजीनगर : डी.एड परीक्षेला उर्दू अध्यापन पद्धती या विषयाच्या परीक्षेला डमी परिक्षार्थी बसल्याचा प्रकार समोर आला आहे. यात परिक्षार्थीसह डमि विद्यार्थ्यावर देखील वेदांत नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ परिक्षार्थी खालीद खूर्शिद व डमि परिक्षार्थी इरफान सुलेमान शेख (मुक्काम पोस्ट पानवाडी, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपीचे नाव आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत डी.एडच्या परीक्षा सुरू होत्या. त्यात ३० एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शासकीय अध्यापक महाविद्यालयात उर्दू अध्यापन पद्धती विषयाचा पेपर सुरू होता. त्यावेळी खालीद खूर्शिद याच्या जागेवर बसलेला विद्यार्थी आणि हॉल तिकीटवर दिसणारा विद्यार्थी वेगळा असल्याचे केंद्र प्रमुखाच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत इतरांना माहिती देत विद्यार्थ्याची चौकशी केल्यावर इरफान सुलेमान शेख याने खालीदने मला परीक्षेला पाठवले असल्याचे कबूल केले. त्यानंतर विद्यापीठातील परीक्षा विभागात याबाबत सुनावणी होऊन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास उपनिरीक्षक सुपे करत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

439 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क