छत्रपती संभाजीनगर : नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने झटपट पैसा कमवण्यासाठी शहरात नशेचा बाजार उभा केला होता. रेल्वे पार्सलच्या माध्यमातून वाराणसीहून दर दोन आठवड्यांनी नशेच्या गोळ्या आणून, त्या पेडलरमार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विक्री केली जात होती. या प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ७०० नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

शिवाजीनगरमधील पाण्याच्या टाकीजवळ गेल्या काही दिवसांपासून एक तरुण नशेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून कान्हा ऊर्फ कृष्णा अण्णा लष्करे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा माल समाधान महादेव उंबासे याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी समाधानला अटक केली. त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता ६४० नशेच्या गोळ्या आढळून आल्या.

ही कारवाई पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पीएसआय अमोल म्हस्के, महेश उगले यांच्या पथकाने केली. या प्रकरणी अंमलदार नितेश सुंदर्डे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही माहिती एका जागरूक विद्यार्थ्याने पोलिसांना दिली होती.

यूपीतील मित्राने दिला नशेच्या व्यवसायाचा सल्ला

समाधान उंबासे हा पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करत होता. तेथे त्याची उत्तर प्रदेशातील एका तरुणाशी ओळख झाली. त्याने समाधानला या नशेच्या गोळ्यांच्या व्यवसायाची माहिती देत, एका बॉक्समागे ७०० ते १००० रुपये मिळतात, असा सल्ला दिला होता. झटपट पैसा कमावण्यासाठी समाधानने हे धंदे चालू केले.

पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. शहरात आणखी कोणी या रॅकेटमध्ये सामील आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,807 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क