छत्रपती संभाजीनगर : सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सोमवारी रात्री चिकलठाणा परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर कारवाई करून तिघांना अटक केली. अंधाराचा फायदा घेत दोघेजण फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी टोळीच्या ताब्यातून घातक शस्त्रसाठा, मिरची पूड, दोरी, एक मोटरसायकल व चार मोबाईल जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे डीबी पथक सोमवारी रात्री गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चिकलठाणा येथील सपना मॅट कंपनीपासून शिंदीबनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच ते सहा जण दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसले आहेत. पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी धाड टाकली असता, दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, तर तिघांना पकडण्यात आले.

अटक केलेल्यांमध्ये निलेश बबनराव लोखंडे (२७, रा. हनुमान नगर), अनुज सौरभ साबळे (२०, रा. भारतनगर), आणि गजानन माणिकराव साळुंके (२०, रा. हनुमाननगर) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून कोयता, धारदार चाकू, टोकदार वाघनख्या, मिरची पूड, दोरी, मोटरसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आले. फरार आरोपींमध्ये अल्ताफ शेख आणि मनोज कांबळे यांचा समावेश आहे. यातील गजानन साळुंके हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना न्यायालयात हजर केले असता २२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ही कारवाई सपोनि भरत पाचोळे, सपोनि कैलास लहाने, पोह हैदर शेख, पोह संतोष सोनवणे, गणेश डोईफोडे, पोअं संतोष गायकवाड, प्रकाश सोनवणे, केवलसिंग घुसिंगे, योगेश म्हस्के, लखसिंग डोबाळ व हरसिंग बोहरा यांच्या पथकाने केली. तपास सपोनि कैलास लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,118 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क