छत्रपती संभाजीनगर : खऱ्या सोन्याच्या एका मणीचा दाखला देत दोन मजुरांनी व्यापाऱ्याची २ किलो खोट्या सोन्याच्या माळेतून तब्बल १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छावणीतील नेहरू चौकात किराणा दुकान चालवणारे आनंदकुमार मुगदिया यांची ही फसवणूक झाली आहे.

८ मे रोजी राजू प्रजापती व राम प्रजापती या नावांनी दोन भाऊ त्यांच्या दुकानात खरेदीसाठी आले. त्यानंतर १२ मे रोजी राम पुन्हा आला आणि बिलात दहाची कमतरता भरून काढण्याच्या नावाखाली ब्रिटिशकालीन शिक्का देऊ पाहिला. मात्र, मुगदिया यांनी तो नाकारला.

१४ मे रोजी संध्याकाळी दोघे भावंडे पुन्हा आले व त्यांनी २ किलो सोन्याची माळ विक्रीस असल्याचे सांगितले. विश्वास बसावा म्हणून माळेतील एक मणी तपासण्यास दिला. मुगदिया यांनी स्वत:च्या हाताने शेवटचा मणी काढून घेतला व तो कासारी बाजारात तपासला असता तो २२ कॅरेटचा खरा असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर १५ मे रोजी रामने पुन्हा संपर्क साधत संपूर्ण माळ ५० लाखांत देण्याचे सांगितले. सौदा २५ लाखांत ठरला. पहिल्या टप्प्यात १६ मे रोजी मुगदिया यांनी पत्नी आणि आईचे दागिने गहाण ठेवून १४ लाखांचे कर्ज घेतले आणि १७ मे रोजी रक्कम देऊन माळ खरेदी केली. मात्र १८ मे रोजी तपासणी केली असता माळ बनावट आणि साध्या धातूची असल्याचे स्पष्ट झाले.

हे आरोपी ‘रॉयल’ असे नाव असलेल्या ८३७३ नंबरच्या रिक्षातून मुगदिया यांच्या घरी गेले होते. बारापुल्ला गेटपर्यंत त्यांची हालचाल दिसून आली असून, छावणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

885 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क