छत्रपती संभाजीनगर : देवगाव रंगारी गावातील आयेशा नगर येथे गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत ५ किलो ६५० ग्रॅम गांजासह एकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख नदीम शेख रौफ (वय ४७, रा. आयेशा नगर, देवगाव रंगारी, ता. कन्नड) असे आहे.
२२ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देवगाव रंगारी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, आयेशा नगर परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये गांजाची विक्री सुरू आहे. पथकाने तातडीने या ठिकाणी छापा टाकून आरोपी शेख नदीम याला गांजासदृश पदार्थासह ताब्यात घेतले.
फॉरेन्सिक तज्ज्ञांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत संबंधित पदार्थ हा ‘गांजा’ असल्याचे स्पष्ट झाले. पंच व तालुका दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत त्या गांजाचे वजन करण्यात आले असता, एकूण ५ किलो ६५० ग्रॅम गांजा सापडला असून त्याची बाजारभावातील किंमत सुमारे १ लाख ६९ हजार ५०० रुपये इतकी आहे. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सतीष वाघ, सपोनि पवन इंगळे, पो.ह. नामदेव सिरसाठ, म.पो.ह. जनाबाई चव्हाण, पो.ह. वाल्मीक निकम, पो.ह. शिवानंद बनगे, पो.ना. दिपक सुरोशे, पो.ना. अशोक वाघ, चा.पो.ह. निलेश कुडे, चा.पो.अं. संजय तांदळे तसेच देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप राजपूत, पोउपनि रमेश चव्हाण, सफौ संजय काळे, पो.ना. भावसिंग जारवाल, पो.ना. किरण जाधव, पो.अ. जमील तडवी यांच्यासह श्री. दिलीप सोनवणे (तालुका दंडाधिकारी), नायब तहसीलदार (कन्नड), फॉरेन्सिक तज्ज्ञ सिताकांत गोपाळ पळसकर (सहायक रासायनिक विश्लेषक) व श्री. संदीप रोहिदास राठोड (जैववैज्ञानिक सहायक) यांनी सहभाग घेतला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*