छत्रपती संभाजीनगर:  सिडको वाळूज परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीतून दोन महागड्या क्रेटा कार चोरल्या असून तिसऱ्या कारची चोरी थोडक्यात फसली. ही घटना बुधवारी (दि. २५) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली आहे.

श्री स्वामी समर्थनगर येथे राहणाऱ्या संगीता कोटमे यांच्या अंगणात उभी असलेली क्रेटा कार (एमएच-२०, ईवाय-८७३३) चोरट्यांनी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास अवघ्या दोन मिनिटांत चोरली. दरवाजा उघडून स्टेअरिंग लॉक तोडून त्यांनी कार पळवली. त्याचप्रमाणे, एएस क्लब परिसरातील तापडिया इस्टेट सोसायटीतील श्रीरंग शेळके यांच्या अंगणातील क्रेटा कार (एमएच-२०, एफजी-६९८८) देखील चोरट्यांनी चोरी केली.

दोन्ही कार चोरल्यानंतर चोरट्यांनी धुळे-सोलापूर महामार्गाने पळ काढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. याच दरम्यान, चोरट्यांनी गणेश नगर परिसरात उभी असलेली आणखी एक क्रेटा कार चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचा सायरन वाजल्याने चोरटे घाबरले आणि घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. श्रीरंग शेळके यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि प्रवीण पाथरकर करत आहेत.

सिडकोत भीतीचे वातावरण:

उच्चभ्रू वसाहतीमधून अंगणात उभ्या महागड्या कारची चोरी झाल्याने सिडकोतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांना अटक करण्याची मागणी होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,296 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क