छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने नवऱ्या मुलासह त्याच्या कुटुंबीयांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन आसाराम भालेराव (रा. तापडिया पार्क, एन-४ सिडको) असे नवऱ्या मुलाचे नाव असून, त्याचे वडील आसाराम भालेराव आणि आई सिंधू भालेराव यांच्यावर देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित २८ वर्षीय तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या म्हणण्यानुसार, ती बी.टेक सिव्हिल इंजिनिअर असून मुंबईत खासगी कंपनीत नोकरी करत होती. मात्र, हर्षवर्धनसोबत लग्न ठरल्याने तिने नोकरी सोडून घरी परतली होती. १३ एप्रिल रोजी हर्षवर्धन व त्याचे कुटुंबीय मुलगी पाहण्यासाठी आले होते. पसंतीनंतर ५ मे रोजी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला आणि १७ नोव्हेंबर ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली.
१२ ऑक्टोबर रोजी, पीडिता घरी एकटी असताना हर्षवर्धनने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने विरोध करत त्याला घराबाहेर जाण्यास सांगितले. यानंतर तो रागाने निघून गेला.
दरम्यान, २५ जुलै रोजी पीडितेच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्याने लग्नाची तारीख पुढे सरकवून १५ डिसेंबर करण्यात आली. लग्नाच्या तयारीसाठी पीडितेच्या कुटुंबीयांनी लग्नाचे कार्यालय, केटरिंग, डेकोरेशन, फोटोग्राफी यांची सर्व तयारी केली. ३०० लग्नपत्रिका देखील वाटल्या होत्या. मात्र, ऐनवेळी हर्षवर्धनने लग्नास नकार दिल्याने कुटुंबावर मोठा आर्थिक व मानसिक आघात झाला.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GnHHHWqYNo25fugeR1tv5k
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*