गंगापूर: गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी येथे रविवारी (दि. ५) हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. पत्नीच्या निधनाने व्यथित झालेल्या पतीने तासाभरातच प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
रुख्मिणीबाई सीताराम शेळके (७५) या मागील काही दिवसांपासून वृद्धापकाळाने आजारी होत्या. रविवारी सकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. मात्र, पत्नीच्या निधनाची बातमी समजताच धडधाकट असलेले सीताराम शेळके (८०) यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनीही तासाभरात प्राणत्याग केला.
या दुहेरी निधनाची बातमी गावात पसरताच नातेवाईक आणि गावकरी मोठ्या संख्येने शेळके कुटुंबियांच्या घरी जमा झाले. दुपारी २ वाजता दोघांवरही एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. शेळके दांपत्याचा असा एकत्रित जगाचा निरोप संपूर्ण परिसराला हळहळवून गेला आहे.
त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आयुष्यभर एकमेकांची साथ देणाऱ्या शेळके दांपत्याने शेवटचा श्वासही सोबत घेतल्याने गावातील लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/FmoEFVMo2Ia7VB6AlALJKH
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*