छत्रपती संभाजीनगर शहरातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कासलीवारपुरम सोसायटीचे अध्यक्ष आणि वकील भाऊसाहेब लांडगे यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात प्राण गमावला आहे. दुर्दैवाने, कुत्र्याचेही प्राण वाचू शकले नाहीत.
ही दुर्घटना संग्राम नगर उड्डाणपुलाखाली घडली. भाऊसाहेब लांडगे नेहमीप्रमाणे आपल्या कुत्र्याला फिवण्यासाठी बाहेर पडले होते. रेल्वे रुळांजवळ आले असता, अचानक चिकलठाणाकडून येणारी रेल्वे दिसली. लांडगे यांनी रुळ ओलांडले, परंतु त्यांचा कुत्रा मागे राहिला. आपल्या पाळीव प्राण्याला वाचवण्यासाठी लांडगे यांनी परत धाव घेतली, पण त्यांचा डोका रेल्वेला धडकला आणि त्यांनी जागीच प्राण सोडला. या अपघातात कुत्र्याचाही मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आणि लोकांमध्ये शोककळा पसरली आहे. लांडगे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*