छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शहराच्या पुढील ३० वर्षांसाठी स्वतंत्र जलनीती तयार केली आहे. महानगरपालिकेने जायकवाडी जलाशय हा एकमेव उद्भव लक्षात घेऊन शहरातील भविष्यातील पाण्याच्या गरजांचा विचार करीत ही जलनीती तयार केली आहे. या अंतर्गत मलनिःसारण प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा पुर्नवापर, रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे, Storm Water व्यवस्थापन तसेच नैसर्गिक पाणी प्रवाहाचे रक्षण अशा अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, या जलनीतीचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२४ रोजी झाले. नागरिकांना या जलनीतीवरील आक्षेप व सूचना ६० दिवसांच्या आत लेखी स्वरूपात महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयात दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासंबंधीचा अधिकृत मसुदा महानगरपालिकेच्या https://chhsambhajinagarmc.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*