Lion-Coming-To-Siddharth-Zoo
छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानात जंगलाचा राजा सिंह लवकरच दाखल होणार आहे. पर्यटकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर उद्यान प्रशासनाने सिंह, अस्वल आणि कोल्ह्याच्या जोडीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कर्नाटकमधील शिवमोगा प्राणिसंग्रहालयाने हे प्राणी देण्याची तयारी दर्शवली असून, त्याबदल्यात येथे तीन वाघ पाठवले जाणार आहेत.
उद्यान अधीक्षक आणि उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले की, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर सिंह आणि इतर प्राण्यांचे स्थलांतर होईल. सध्या सिद्धार्थ उद्यानात वाघ, बिबट्या, नीलगाय, सांबर, काळवीट, मगर, शहामृग आणि अनेक वन्यप्राणी आहेत. मात्र, सिंह नसल्याने पर्यटकांची निराशा होत होती.
दरम्यान, मिटमिटा येथे महापालिकेचे सफारी पार्क उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यानंतर प्राण्यांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याने पर्यटकांना लवकरच सिंहाचे थेट दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*