छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळावरून काही विमानसेवा बंद झाल्यानंतरही प्रवाशांच्या संख्येत घट होण्याऐवजी उलट वाढ होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः दिल्ली व हैदराबादसारख्या प्रमुख शहरांच्या विमानसेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, यामुळे नव्या उड्डाणांची गरज अधोरेखित होत आहे.

अहमदाबादसाठीची सेवा डिसेंबर २०२४ मध्ये बंद झाली, तर नागपूर-लखनऊ विमानसेवा मार्च २०२५ मध्ये बंद झाली. तरीदेखील, नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्रवाशांची टक्केवारी वाढल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. हे वर्ष छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी प्रवासी वाढीचे ठरणार आहे, असे संकेत मिळत आहेत.

सध्या शहरातून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी दररोज दोन विमानांची सेवा सुरू आहे. बंगळुरू, गोवा आणि कोयम्बतूरसाठी आठवड्यातून तीन दिवस उड्डाणे होत आहेत. विशेषतः दिल्ली व हैदराबादसाठीच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली असून, या मार्गांवरील उड्डाणांची संख्या वाढवण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

विमानसेवा बंद होऊनही प्रवाशांचा प्रतिसाद कायम राहणे हे सकारात्मक संकेत असून, या शहराच्या विमानसेवेच्या वाढीची क्षमता दर्शवते. चिकलठाणा विमानतळाचे संचालक शरद येवले हे नवे मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही केंद्र व विमान कंपन्यांपुढे पाठपुरावा करावा, अशी प्रवाशांकडून अपेक्षा आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

764 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क