गजानन राऊत, वाळूज / प्रतिनिधी:  मोबाईलवर देवीची आरती लावल्याच्या कारणावरून शेजाऱ्याने मारहाण केल्याने अपमान सहन न झालेल्या महिलेने अंगावर डिझेल टाकून आत्मदहन केलं. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

12 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता मयत महिला सीता युवराज तोरकड (रा. रांजणगाव शेणपुंजी) हिने मोबाईलवर देवीची आरती लावली होती. त्यावरून शेजारी राहणाऱ्या भगवान सैनाजी गिऱ्हे यांनी वाद घालत सीता यांच्या पोटात लाथ मारली तसेच केस धरून मारहाण केली.

या अपमानानंतर दुसऱ्या दिवशी, 13 एप्रिल रोजी सकाळी सीता तोरकड यांनी अंगावर डिझेल टाकून स्वतःला पेटवून घेतले. पती युवराज तोरकड यांनी धावत जाऊन पाणी टाकत त्यांना विझवले आणि तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान सिता यांनी पतीला सांगितले की, “भगवान गिऱ्हे यांनी केलेल्या मारहाणीमुळे आणि झालेल्या अपमानामुळे मी स्वतःला पेटवले.” अखेर 19 एप्रिल रोजी उपचारादरम्यान सीता यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी युवराज तोरकड यांच्या फिर्यादीवरून भगवान गिऱ्हे यांच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,468 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क