नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यभरात थंडीची जोरदार लाट जाणवत असून, अनेक शहरांमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने 27, 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमान
राज्यातील पुणे शहर थंडीने गारठलं असून, आज सकाळी तापमान फक्त 10.6 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. पुण्यासोबत नाशिक, अहमदनगर आणि संभाजीनगरमध्येही थंडीचा कडाका जाणवत आहे. नाशिकमध्ये तापमान 25.8 डिग्री तर संभाजीनगरमध्ये 14 डिग्री सेल्सिअस आहे.
कोल्हापुरात अजूनही थंडीची प्रतीक्षा
कोल्हापूरसारख्या काही भागांमध्ये अजूनही थंडी जाणवत नसून, येथील तापमान 26.6 डिग्री सेल्सिअस आहे. मात्र, आगामी काही दिवसांत येथेही तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
महाबळेश्वर, मुंबईतही गारवा
महाबळेश्वरमध्ये तापमान 18.8 डिग्री सेल्सिअस असून, मुंबईत 25 डिग्री सेल्सिअस आहे. मुंबईकरांनाही या आठवड्यात थंडी जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
प्रमुख शहरांतील तापमान
- पुणे: 10.6°
- नाशिक: 25.8°
- अहमदनगर: 23.2°
- संभाजीनगर: 14°
- कोल्हापूर: 26.6°
- महाबळेश्वर: 18.8°
- मुंबई: 25°
- सोलापूर: 27°
- नांदेड: 25°
थंडीपासून संरक्षणासाठी सूचना
थंडीचा प्रकोप लक्षात घेता नागरिकांनी रात्री उबदार कपडे घालणे, गरम पदार्थांचा आहारात समावेश करणे आणि थंडीत प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*