विजय शेजुळ प्रतिनिधी/सिल्लोड: तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा रब्बी हंगामात डाॅलर (काबुली) हरभराची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. खरीप हंगामातील मक्याला अपेक्षित दर न मिळाल्याने आणि उत्पादन खर्च जास्त असल्याने शेतकऱ्यांनी डाॅलर हरभऱ्यास प्राधान्य दिले आहे. या पिकाला बाजारात दहा ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतो, त्यामुळे कमी खर्चात अधिक नफा देणारे पीक म्हणून त्याला ओळखले जाते.
तालुक्यातील उपळी, पळशी, लोणवाडी, मांडगाव, खातखेडा या गावांमध्ये डाॅलर हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या भागातील पोषक हवामान आणि चांगल्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे पिकांची वाढ चांगली झाली असून उत्पादनही समाधानकारक होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की डाॅलर हरभऱ्याला बाजारपेठेत चांगली मागणी असल्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून हा पर्याय फायदेशीर ठरतो. यामुळे इतर पिकांपेक्षा शेतकरी डाॅलर हरभऱ्याकडे वळत आहेत. यावर्षी या पिकातून चांगल्या नफ्याची अपेक्षा आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*