राज्यातील मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना, भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, संभाजीनगर येथील सुपारी हनुमान मंदिरात भाजप पदाधिकाऱ्यांनी महाआरती करून संकटमोचक हनुमानाची प्रार्थना केली.
भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले की, “हनुमानाची आरती करून फडणवीस यांच्या समोरील अडथळे दूर व्हावेत, अशी प्रार्थना करण्यात आली. राज्यातील युतीला मिळालेल्या यशाचे श्रेय फडणवीस यांना जाते, त्यामुळे तेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा आहे.”
महाआरतीत भाजपचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शहरातील लाडक्या बहिणींचीही उपस्थिती होती. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास हनुमान मंदिरात मोठी पूजा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
भाजपच्या वतीने राज्यभरात विविध ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ महाआरतीचे आयोजन होत असून, या उपक्रमामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*